कोतवाल पदाची सरळ सेवा भरती 2023 Kotawal Pad Bharati 2023

कोतवाल पद भरती जाहीर करण्यात आलेली आहे. गावनूसार  रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून सदर पद भरतीसाठी अर्ज मागवण्याची प्रक्रीया सुरू करण्यात आलेली आहे. तरी पात्र उमेदवारांनी सदरचा लेख काळजीपूर्वक वाचावा. संपूर्ण माहिती बरोबर असल्याची खात्री करावी.

संपूर्ण नांदेड जिल्ह्यातील तालूका  निवड समीती मार्फत कोतवाल पदासाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.सदर पदभरतीचा कालबध्द कार्यक्रम जाहीर करण्यात त्यानूसार जाहीर करण्यात आलेला कार्यक्रम पूढील प्रमाणे


Kotawal Pad Bharati 2023,
कोतवाल पदाची सरळ सेवा भरती 2023, Kotawal Pad Bharati 2023,


 Kotawal Pad Bharati 2023

कोतवाल भरती 2023 करीता कालबध्द कार्यक्रम

अ.क्र

कालबध्द कार्यक्रमानूसार करावयाची कार्यवाही

कालावधी

1

जाहिरत प्रसिध्द करणे

02.09.2023

2

अर्ज स्विकारण्याचा कालावधी

04.09.2023 ते 13.09.2023

3

पात्र / अपात्र अर्जाची छाननी करून यादी प्रसिध्द करणे

14.09.2023

4

परिक्षेचे प्रवेशपत्र पोस्टाने पाठवणे

18.09.2023 पर्यंत

5

लेखी परिक्षा

24.09.2023

 

टिप- 1) उपरोक्त कार्यक्रमात फेरबदल करण्याचे अधिकार तहसिलदा यांना राहतील.

        2) उपरोक्त कार्यक्रमात फेरबदल झाल्यास या कार्यालयाचे संकेतस्थळ   

              nanded.gov.in वर वेळोवेळी अवगत करण्यात येईल कोणालाही

               व्यक्तीशः अवगत करण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी.

'कोतवाल पदाची सरळ सेवा भरती" "2023 Kotawal Pad Bharati 2023"

 

सोबतच्या जाहिरातीप्रमाणे तहसीलदार -------    जिल्हा नांदेड यांच्या आस्थापनेवरील कोतवालांची रिक्त पदे भरण्यात येणार आहे.

1)     कोतवाल पदाकरता उमेदवार खालील अटीस पात्र असावा

अ)       उमेदवार शारीरिकदृष्ट्या सुदृढ असावा.

आ)          दिनांक  02/09/2023 रोजी वय 18 पेक्षा कमी व 40 पेक्षा जास्त नसावे.

इ)     अर्जदार हा तलाठी सजा अंतर्गत रहिवासी असावा.

ई)     अर्जदार किमान इयत्ता चौथी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

उ)    कोतवाल या पदावर नियुक्ती ही निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाची असेल.

ऊ)  कोतवालास प्रतिमा रुपये 15000 इतके एकत्रित मानधन अनुज्ञेय राहील.

2)   अर्ज करण्याची पद्धत

अ) अर्ज सेतू सुविधा केंद्रामार्फत प्रत्येकी 20 रुपये या दराने उपलब्ध करून देण्यात येत आहे.

आ)          विहित नमुन्यातील अर्ज त्या तहसील कार्यालयामध्ये कार्यालयीन कामकाजाचे दिवशी प्रत्यक्ष सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत सादर करावेत."Kotawal Pad Bharati 2023"

इ)     उमेदवारांनी संपूर्ण भरलेला अर्ज शैक्षणिक पात्रता जातीचे प्रमाणपत्र इत्यादी विहित नमुन्यात भरून माननीय तहसीलदार तथा सदस्य सचिव निवड समिती येथे दिनांक 04/09/2023 ते 13/09/2023 या कालावधी सायंकाळी सहा वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत संबंधित तहसील कार्यालयातील कोतवाल भरती कक्षात सादर करावा. विहित वेळेनंतर कोणत्याही प्रकारचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. कोणीही पोस्टामार्फत किंवा कुरियर मार्फत अर्ज पाठवू नये. पाठविल्यास सदर अर्जाचा विचार केला जाणार नाही. व कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही याबाबत सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

 

3)   कोतवाल पदाकरता अर्ज सादर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे व इतर अटी.

अ) इयत्ता चौथी उत्तीर्ण गुणपत्रिका किंवा महत्तम प्राप्त शैक्षणिक गुणवत्ता दर्शवणारी गुणपत्रिका.

आ)                    शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र.

इ)     सज्यातील रहिवासी असल्याबाबत तलाठी यांनी दिलेला रहिवासी पुरावा / दाखला.

ई)     आरक्षित पदाचे अर्जाकरीता जातीचे प्रमाणपत्र किंवा जात वैधता प्रमाणपत्र.

उ)    मागासवर्गाकरिता उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र.

ऊ)  मागासवर्गीय उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र काढलेले असणे आवश्यक राहील, व जात वैधता प्रमाणपत्रावर नियुक्तीनंतर सहा महिन्याच्या आत सादर करणे आवश्यक राहील. उमेदवार मागासवर्गीय असल्यास त्या जात प्रवर्गाचे मूळ जात प्रमाणपत्र तपासणीच्या वेळी सादर करणे बंधनकारक राहील.

ऋ)  संबंधित उमेदवाराच्या जात वैधता प्रमाणपत्राच्या अधीन राहून जात वैधता प्रमाणपत्र सहा महिन्याच्या आज सादर करण्याच्या अटीवर बंदपत्र / शपथ पत्र लिहून दिल्यानंतर विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.

ऌ)  अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व खुला प्रवर्ग वगळून अन्य सर्व प्रवर्गातील मागासवर्गीय उमेदवारांसाठी 31/03/2024 पर्यंत वैद्य असलेले उन्नत्व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र काढलेले असणे आवश्यक राहील.

ऍ)    उमेदवारास महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागातील निर्देशानुसार लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक राहील.

ऎ)    कोतवाल म्हणून नेमणूक झाली तर त्याची नेमणूक दिलेल्या सज्जाच्या ठिकाणी राहून काम करेल असे बॉण्डवर हमीपत्र द्यावे लागेल.

ए)    निवड झालेल्या उमेदवारासस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

ऐ)    कोतवाल हा पूर्णपणे ग्राम कामगार असेल कोतवाल हे पद गट क व गट संवर्गातील नसून ते अवर्गीकृत पद आहे.

ऑ)                    उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी स्वखर्चाने हजर राहावे लागेल.

 शुल्क फी

प्रवर्ग

परीक्षा शुल्क

खुला

500/-

मागास प्रवर्ग

400/-

 

वरील प्रमाणे प्रवेश शुल्क तहसीलदार -------------(संबंधीत तालूक्याच्या) या नावाने राष्ट्रीय बँकेचे डीडी डीमाड ड्रॉप अर्जासोबत सादर करावा. परीक्षा शुल्क ना परतावा राहील .

4)  निवड पद्धत  कोतवाल पदाची सरळ सेवा भरती, 

अ) लेखी परीक्षेसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाचे 50 प्रश्नांची प्रत्येकी दोन गुण याप्रमाणे 100 गुणांची राहील. परीक्षेद्वारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड करण्यात येईल.

आ)         लेखी परीक्षेला मराठी, सामान्य ज्ञान, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी व स्थानिक जिल्ह्यातील माहिती या विषयावरील प्रश्न राहतील.

 

5)    निवडीसाठी सर्वसाधारण सूचना.

अ)  उमेदवार समान गुण मिळाल्यास परीक्षेत ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांना गुणवत्ता क्रम शासन निर्देशानुसार लावण्यात येईल.

आ)                   लेखी परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणाच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवडीसाठी उमेदवारांना शैक्षणिक व इतर संबंधित मूळ कागदपत्रे तपासणीसाठी उपलब्ध करून द्यावी लागतील. अन्यथा अंतिम निवडीसाठी विचार केला जाणार नाही. व पुढील गुण अनुक्रमाने पात्र असणाऱ्या उमेदवारांना संधी दिली जाईल.

इ)    जाहिरात जिल्हा संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

ई)    उमेदवारांनी नजीकच्या काळातील स्वतःची छायाचित्र दोन प्रतीत व स्वाक्षरी केलेला अर्ज संपूर्ण माहिती व आवश्यक कागदपत्रासह सादर करावा.

6)   इतर महत्त्वाची माहिती

अ) पात्र उमेदवारांना पोस्टद्वारे प्रवेश पत्र पाठवण्यात येतील ज्यांना दिनांक 22/09 /2023 पर्यंत प्रवेशपत्र प्राप्त होणार नाहीत. अशा उमेदवारांना 23 /09/2023 रोजी सायंकाळी सहा वाजेपर्यंत तहसील कार्यालय येथे प्रवेश पत्र देण्यात येईल.

आ)                   परीक्षा केंद्र तपशील प्रवेश पत्रावर नमूद असेल.

इ)    उमेदवार यांनी परीक्षेच्या नियोजित वेळेपूर्वी एक तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे.

पदाचे नाव व परीक्षा

 दिनांक

वेळ

कोतवाल (लेखी परीक्षा)

24.09.2023

दुपारी 02.00 ते 03.00

 

ई)    जाहिरातीला अनुसरून ज्या उमेदवारांचे अर्ज विहित कालावधीत प्राप्त होतील केवळ अशाच उमेदवारांचे अर्ज विचारात घेतले जातील. अन्य कोणत्याही संदर्भातील यापूर्वी कार्यालयात प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. ज्या उमेदवारांनी या जाहिरातीपूर्वी तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे कोतवाल पदासाठीच्या नोकर भरतीसाठी अर्ज केलेला आहे. त्या उमेदवारांचे अर्जांचा विचार केला जाणार नाही. काही प्रशासकीय अथवा तांत्रिक अडचण उद्भवल्यास निवड स्थगिती व अथवा रद्द करण्याचे संपूर्ण अधिकार समितीस राहील.

महत्वाची सुचना

वरील प्रमाणे सदर जाहीरत प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तालूक्यातील गावानुसार व प्रवर्गानुसार जाहीरत देण्यात आलेली आहे. तरी पुढे सविस्तर जाहीरत डाऊनलोड करा व काळजीपूर्वक वाचा आणि पात्र असल्या फॉर्म भरा.

 कोतवाल पदाची सरळ सेवा भरती 2023, Kotawal Pad Bharati 2023,

            कृषी व ग्रामीण  विकास बँक पद भरती 2023 साठी             क्लिक करा

            महाराष्ट्र शासन तंत्र शिक्षण  विभाग पद भरती 2023             क्लिक करा

            स्टाफ सिलेक्शन कमिशन पद भरती 2023                         क्लिक करा

             कोतवाल पदाची जाहीरत डाऊनलोड करण्याठी ---            क्लिक करा

 

               


गृहनिर्माण बँकेत परमनंट पद भरती 2023