मराठा आरक्षणासाठी शेत विकले, आंदोलनाचा चेहरा बनलेले मनोज जरांगे-पाटील,

    जालना- जालन्यातील अंरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर पोलीसांनी लाठीमार केल्यानंतर राज्यभर  तिव्र प्रडसाद उमटले आहेत. या आंदोलनाचा चेहारा बनलेले मनोज रावसाहेब जरांगे पाटील  यांच्या  विषयी आज आपण सविस्तर माहीती पहाणार आहेत.

कोण आहे मराठा समाजाचे आक्रमक चेहारा.

        मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलनाचा प्रमुख नेतृत्व म्हणून पूढे आले आहेत. जरांगे पाटील यांची आर्थिक परिस्थीती सामान्यच, शिक्षण म्हटल तर फक्त 12 वी पास. हॉटेलमध्ये काम करत करत त्यांनी स्वत:ला समाजकार्याल झोकून  दिले. जरांगे पाटील यांचे मुळ गाव बीड जिल्ह्यातील मातोरी (ता. शिरूर) पण नंतर ते जालन्यातील अंकुशनगर (ता. अंबड) येथे राहतात. पूर्ण वेळ मराठा समाजासाठी कार्यरत जरांगे पाटील यांच्या कुटूंबात पत्नी, चार मुले, तीन भाऊ आणि आई वडील आहेत. त्यांची एकुण चार एकर जमीन होती, यातील दोन एकर जमीन त्यांनी मराठा आरक्षण आंदोलनासाठी  विकली आहे (Manoj Jarange Patil)"मनोज जरांगे-पाटील"


मराठा आरक्षणासाठी शेत विकले, आंदोलनाचा चेहरा बनलेले मनोज जरांगे-पाटील,

मराठा आरक्षणासाठी शेत विकले, आंदोलनाचा चेहरा बनलेले मनोज जरांगे-पाटील,

          काँग्रेस पक्षात काम

          सुरवातीला जरांगे पाटील यांनी काँग्रेस पक्षात काम केले. परंतू त्यांच मन पक्षात रमल नाही त्यांनी काँग्रेस पक्षाशी फारकत घेतली.

शिवबा संघटनेची स्थापना

 जरांगे पाटील यांनी शिवबा संघटनेची स्थापना केली.  अतिशय आक्रमकपणे त्यांनी संघटनेच्या कामाला सूरवात केली. नगर  जिल्ह्यातील कोपर्डी अत्याचारातील आरोपीनां फाशी मिळावी यासाठी जरांगे पाटील यांनी मोठ आंदोलन उभारल होत. कोपार्डी प्रकरणातील  आरोपींवरील हल्ला प्रकरणी शिवबा संघटनेच्या कार्यकत्यांवर आरोप झाला होत  "आंदोलनाचा चेहरा बनलेले मनोज जरांगे-पाटील"

हक्कासाठी लढणे- आंदोलन करणे हा जरांगे पाटील यांचा स्थायीभाव

सन 2021 मध्ये त्यांनी जालन्यातील साष्ट  पिंपळगाव येथे तब्बल 3 महीने  ठिय्या आंदोलन केले. शिवाय सहा  दिवस उपोषणही केल. गोरगंधारी येथे केलेल्या आंदोलनातून त्यांनी मराठा आरक्षण लढ्यात मृत पावलेल्या कुटूंबीयांना मदत  मिळवून  दिली.

          मनोज जरांगे पाटील 2011 पासून मराठा आरक्षण चळवळीत सक्रीय आहेत.  त्यांच्या नेतृत्वात 2014 मध्ये  औरंगाबाद   विभागीय आयुक्त कार्यालयावर काढलेल्या मोर्चाने राज्याचं लक्ष वेधून घेतल होत. आतापर्यंत त्यांनी मराठा आरक्षणासाठी 35 हून अधिक मोर्चे, आंदोलने केली.

पैठण फाटा येथे जनआक्रोश मार्चा

          काही  दिवसापूर्वी पैठण फाटा येथे आरक्षणाच्या मांगणीसाठी  जनआक्रोश मोर्चा काढला होता. यात काही लाख लोक सहभागी झाले होते. पण याला सरकारकडून काहीच प्रतीसाद न मिळाल्याने अंरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू केले. येथे दररोज हजारोच्या संख्येने लोक येत होते. या आंदोलांकावर 01.09.2023 रोजी पोलीसांनी लाठीमार केला.

          सदर घटनेनंतर सर्वच पक्षांच्या नेत्यांनी त्यांची चौकशी केली. व सदर आंदोलनास पाठींबा असल्याचे जाहीर केले व झालेल्य घटनेचा  निषेध ही नोंदवला.

          सदर लेख जर आपल्याला आवडला असेल तर जरूर शेअर करा.


कृषी व ग्रामीण  विकास बँक पद भरती 2023 साठी             क्लिक करा

महाराष्ट्र शासन तंत्र शिक्षण  विभाग पद भरती 2023             क्लिक करा

स्टाफ सिलेक्शन कमिशन पद भरती 2023                         क्लिक करा